रंगांची उधळण करीत बालचित्रकारांचा सामाजिक संदेश; सारसबागेत चित्रकला स्पर्धा
रंगांची उधळण करीत बालचित्रकारांचा सामाजिक संदेश; सारसबागेत चित्रकला स्पर्धा पुणे : स्मार्ट सिटी, वाहतूक समस्या, रक्तदान श्रेष्ठदान, ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या सामाजिक विषयावर आपल्या कल्पनाशक्तीतून नाविण्यपूर्ण चित्रे कॅनव्हासवर रेखाटत बालचित्रकारांनी सामाजिक संदेश दिला. बालचित्रकारांसोबतच उपस्थित मान्यवरांनी देखील चक्क विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्र काढत त्यामध्ये रंग भरल्याचे दृश्यं पाहून उपस्थितांना देखील प्रोत्साहन मिळाले. राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १६७ शाळांतील सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित द. मि. कै. सि. धों. आबनावे कला महाविद्यालयातर्फे सारसबागेत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिल्पकार विवेक खटावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष व सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, प्रकाश आबनाव...